पोलादपूर जवळील अपघातात मोटारसायकलस्वार ठार

सुनील पाटकर
शनिवार, 23 जून 2018

महाड : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळील लोहारमाळ येथे भरधाव येणाऱ्या इको कारने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृध्द मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. 23 जूनला दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. 
मृत मोटारसायकलस्वार रामचंद्र तुकाराम नरे (वय 73.) हे लोहारमाळ येथील राईस मिल व्यावसायिक आहेत. 

ते आपल्या नातवाला शाळेतून आणण्यासाठी मोटारसायकलने जात असताना संगमेश्वरकडे जाणाऱ्या इकोने त्यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यु झाला तर इकोकार झाडावर आदळून कलंडल्याने त्यातील दिनकर आमकर व तेजस्वी आमकर हे दांपत्य जखमी झाले. त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: Motorcycle and two wheeler accident near Poladpur one man killed