समुद्रात हालचाली वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सिंधुदुर्गनगरी - मान्सून जवळ आल्याने समुद्रात वेगाने बदल होत आहेत. अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र स्थानाचा आनंद लुटताना आपल्या जिवीताची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पर्यटकांना आवाहन करण्यात आले की मान्सून कालावधी जवळ आल्याने समुद्रात वेगाने बदल होत आहेत. समुद्रातील अंतर्गत प्रवाह सक्रीय झालेला आहे. समुद्री लाटांचा प्रवाह आणि आवाज वाढला आहे. हे संकेत पाऊस आणि वादळाचे असण्याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर समुद्र किनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यक आहे.

मालवण तालुक्‍यातील वायरी-भूतनाथ येथील १५ एप्रिलला बेळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुद्राच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. यामुळे सर्व पर्यटकांनी स्वतःची काळजी स्वतःच घेणे आवश्‍यक आहे. शक्‍यतो खोल समुद्रात स्थानासाठी जाऊ नये. समुद्र स्नानाचा आनंद घ्यायचा असल्यास लाईफ जॅकेटला वापर करावा. मद्यपान करून समुद्रस्नानासाठी उतरू नये. आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिकांनी केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सुरक्षेबाबतची आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केले आहे.

Web Title: movement increase in sea