Loksabha 2019 : स्वाभिमान पक्षाला काँग्रेसने पाठिंब्या देण्याचा प्रश्‍नच नाही

 Loksabha 2019 : स्वाभिमान पक्षाला काँग्रेसने पाठिंब्या देण्याचा प्रश्‍नच नाही

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. दोन-तीन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल. काँग्रेस नेतृत्वावर जहरी टीका करून जे बाहेर पडले, त्यांना आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही, असे खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दलवाई म्हणाले, की आघाडीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून लवकरच त्यांची नावे जाहीर केली जातील. नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला हा लोकसभा मतदारसंघ सोडण्याची चर्चा सुरू होती. 

यावर दलवाई म्हणाले, की आमचा मतदारसंघ कोणालाही सोडणार नाही. आम्ही  स्वाभिमान बाळगणार आहोत. इतर कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा देणार नाही. ज्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ तसेच हाय कमांडवर टीका करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली, त्यांनाच पुन्हा पाठिंबा देण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकचा मोदी सरकारने राजकीय इश्‍श्‍यू केला आहे. सैनिकांपेक्षा जणू आम्हीच सीमेवर जाऊन कारवाई केल्याचे ते भासवत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत देशात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. 

सीमेवरील अतिरेकी कारवाईत जवान शहीद होत आहेत. निरपराध लोकांचे बळी जात आहेत. याकडे मोदी सरकारने लक्ष दिलेले नाही. वाढत्या शेती उत्पादन खर्चाने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. पण प्रत्यक्षात कारखानदारीच बंद पाडण्याचे काम मोदी सरकारने केले. निश्‍चित केलेले कोणतेही उद्दिष्ट या सरकारला गाठता आलेले नाही. साडेचार वर्षांच्या कालावधीत कोकणच्या पदरी काही पडलेले नाही. दुष्काळामुळे गावे ओसाड पडली. लोकांचे स्थलांतर होत आहे. त्यामुळे भाजप विरोधात लोकांमध्ये रोष आहे.  

लोकांचा विरोध नसेल तेथे प्रकल्प
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल. नाणार प्रकल्पात लोकांसमवेत काँग्रेस राहिला. यातून मोठी रोजगारनिर्मिती केली जाणार होती. काँग्रेसची सत्ता आल्यास जिथे लोकांचा विरोध नसेल तिथे प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न करू. कोकणाबाहेर प्रकल्प जाऊ नये, अशी माझी भूमिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com