राणेंचा  "स्वाभिमान' सिंधुदुर्गातील तिन्ही जागा लढविणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कणकवली - "आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यातील तीनही जागा लढविणार आहे; मात्र उमेदवार मीच जाहीर करणार आहे. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा,' असे आदेश खासदार नारायण राणे यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत दिले. 

ओसरगाव महिला भवन येथे आयोजित जिल्हा कार्यकारिणीला आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत आदी उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ""आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. तत्पूर्वी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रामाणिक मदत करा. पक्षाकडून सहकार्य करा. जनतेच्या दुःखात सहभागी व्हा. केवळ सोशल मीडियावर चर्चा करू नका. योग्य वेळी मी उमेदवार जाहीर करीन.'' 

दत्ता सामंत म्हणाले, ""कुडाळ मतदारसंघात माझ्या नावाची चर्चा केली जात आहे; मात्र मी निवडणूक लढणार नाही. राणे जी जबाबदारी देतील ती पक्षासाठी प्रामाणिकपणे पार पाडीन.'' सतीश सावंत म्हणाले, ""मी राणेंचाच कार्यकर्ता म्हणून आहे. कोणत्याही पक्षात जाणार नाही. विनाकारण माझ्या नावाची चर्चा घडविली जात आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment