१२२ वेळा चर्चेत १ हजार २१ प्रश्‍न

१२२ वेळा चर्चेत १ हजार २१ प्रश्‍न

रत्नागिरी - सोळाव्या लोकसभेत (२०१४ ते २०१९) पंधरा अधिवेशनांमध्ये ८० टक्के उपस्थिती, १२२ वेळा चर्चांमध्ये सहभाग व १ हजार २१ प्रश्‍न विचारण्याची कामगिरी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. देशभरातील खासदारांच्या उपस्थितीच्या तोलाची त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या संसदीय कामकाजाचा हा लेखाजोखा.

देशभरातील खासदारांची सोळाव्या लोकसभेत सरासरी ८० टक्के, तर महाराष्ट्रातील सर्व खासदरांची उपस्थिती ७८ टक्के आहे. देशभरातील खासदारांची प्रश्‍नोत्तराच्या तासाला सरासरी २९२ प्रश्‍नांची आहे. म्हणजे प्रत्येकाने तेवढे प्रश्‍न विचारले आहेत.

महाराष्ट्रीय खासदारांनी प्रत्येकी सरासरी ६०५ प्रश्‍न विचारले. या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांनी १ हजार २१ प्रश्‍न विचारले. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेमध्ये खासदार राऊत यांनी १२२ वेळा भाग घेतला. देशभरातील खासदारांनी प्रत्येकी ६७.१ वेळा, तर महाराष्ट्रातील खासदारांनी ६८.६ इतका चर्चेत भाग घेतल्याची नोंद आहे. 

दोन खासगी विधेयकेही त्यांनी लोकसभेत सादर केली. राऊत यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या सामाजिक, आर्थिक कल्याणासाठी द ट्रॅडिशनल फिशरमन (सोशो- इकॉनॉमिक प्रोटेक्‍शन ॲण्ड वेल्फेअर) बिल -२०१७ त्यांनी मांडले. बाल मजुरी निर्मूलनासाठी द चाईल्ड लेबर (अबॉलिशन) बिल- २०१६ त्यांनी मांडले.

ऊर्जा मंत्रालयाच्या स्थायी समितीवर पाच वर्षे काम करताना मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी दीनदयाल ग्रामज्योती योजनेअंतर्गत ८२ कोटी रुपयांचा निधी, तर शहरी भागासाठी आयटीडीएस योजनेअंतर्गत ९० कोटींचा निधी आणला. हवाई सल्लागार समितीवर त्यांनी पाच वर्षे काम करताना चिपी विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी प्रयत्न केला.

मतदारसंघातील नागरिकांनी टाकलेल्या विश्‍वासामुळे आणि जबादारीमुळेच अधिवेशनामध्ये सक्रिय राहून रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे सजग प्रतिनिधित्व करता आले. संसदीय कामकाजाचा लेखाजोखा सर्वांसमोर ठेवणे आवश्‍यक होते.
- विनायक राऊत,
खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com