
"ब्युटी वुईथ पर्पज"मध्ये सर्वोच्च बहुमान मिळवलेल्या विवाहीतीने भारतासह आशिया खंडाचेही प्रतिनिधित्व केले.
कोकणातल्या 'या' सौभाग्यवतीच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकूट
चिपळूण (रत्नागिरी) : येथील डॉ. कांचन मदार या चीन येथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत विजेत्या ठरल्या आहेत. त्यांचा मिसेस युनिव्हर्स फ्रिलांथ्रोपी या सर्वोच्च व बहुमोल सन्मान मिळाला आहे. डॉ. मदार यांनी सौदर्यासोबत बुद्धीमत्तेचा वापर सामाजिक जागृतीसाठी केल्याची खास नोंद घेण्यात आली. चीनमध्ये झालेल्या या विश्वसुंदरी स्पर्धेत 90 देशातील विवाहित महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.
बुद्धीमत्तेच्या जोरावर जिंकली स्पर्धा
अमेरिका, जपान, आफ्रिका, म्यानमार, नेपाळ, युएएस, रशिया, कोरिया, इंग्लंड आदी देशांचा समावेश होता. या स्पर्धेत डॉ. मदार यांनी भारतातील विविध भागातील नृत्यपरंपरेचे सादरीकरण केले. यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम्, लोकनृत्य, शास्त्रीय संगीत, लावणी आदींचा समावेश होता. या सर्व नृत्यप्रकारातील त्यांचे विशेष प्राविण्य परीक्षकांना भावले. नृत्याची देवता नटरानीची त्यांनी वेशभूषा केली होती. सौंदर्यासोबत बुद्धीमत्तेचा वापर समाजासाठी कशा प्रकारे केला, हे त्यांनी व्याख्यानातून दाखवून दिले. यापूर्वी त्यांनी मिसेस युनिव्हर्स सेंट्रल एशिया, मिसेस युनिव्हर्स आयपीडब्ल्बू अचिव्हर, मिसेस इंडिया राष्ट्रीय वैद्यकीय भूषण इंटरनॅशनल प्राइड वुमन असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.
हेही वाचा - सावधान ! सिगारेट ओढताय..
कौटुबिंक हिंसाचारावरील संशोधन भावले
कौटुबिंक हिंसाचारावर स्वतः केलेले संशोधन त्यांनी सादर केले. याबाबत त्यांनी पुरुष व स्त्रियांची मते घेतली होती. डॉ. मदार यांची ही विशेष उपक्रमही खूप भावला. महिला केवळ सुंदर असून उपयोगाच्या नाहीत. सौंदर्यासोबत बुद्धीमत्तेचा वापर समाजासाठी कसा करता, हे परीक्षकांनी पाहिले. डॉ. कांचन मदार यांनी बुद्धीमत्तेचा वापर नारी सक्षमीकरणासाठी केला. विशेषतः ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचार, एड्स व कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमाचाही परीक्षकांनी विशेष नोंद घेतली.
हेही वाचा - देशभरातील मांजरे पाहायची आहेत..? या कोल्हापुरात....
"ब्युटी वुईथ पर्पज"मध्ये सर्वोच्च बहुमान
वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. कांचन मदार यांनी भारतासह आशिया खंडाचेही प्रतिनिधित्व केले. डॉ. मदार यांनी "ब्युटी वुईथ पर्पज" या उपक्रमात सर्वोच्च बहुमान मिळवला आहे.