मृगगडाने घेतला मोकळा श्वास; दुर्गवीर प्रतिष्ठानची मृगगड श्रमदान मोहीम फत्ते

आडवाटेतील हा किल्ला सुंदर अश्या निसर्गासहित अतिशय महत्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो जपण्याचे व या वास्तूंच्या संवर्धनाचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 5 ते 6 वर्षे सातत्याने करत आहे.
मृगगडाने घेतला मोकळा श्वास; दुर्गवीर प्रतिष्ठानची मृगगड श्रमदान मोहीम फत्ते

पाली - मृगगड किल्ला रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. नियमित श्रमदान मोहिमेचा भाग म्हणून रविवारी (ता. 5) दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचे नेतृत्व प्रशांत डिंगणकर यांनी केले. मंगळवारी (ता.7) प्रशांत डिंगणकर यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

आडवाटेतील हा किल्ला सुंदर अश्या निसर्गासहित अतिशय महत्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो जपण्याचे व या वास्तूंच्या संवर्धनाचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 5 ते 6 वर्षे सातत्याने करत आहे. या मोहिमेत गडावरील जोते आणि सदरेच्या तिन्ही बाजूंचा दगडांचा ढिग मोकळा करण्यात आला. या विस्कळीत भिंतीचे दगड मुळ बांधणीला न हलवता व्यवस्थित बसविण्यात आले. तसेच किल्ल्यावरील वाढलेले गवत काढण्यात आले. पाण्याची टाकी, गडावरील वास्तू व मंदिर परिसरातील स्वच्छता केली गेली.

या मोहिमेत महेश सावंत, विशाल बामणे, प्रशांत डिंगणकर, अमित शिंदे, भूषण पाटील, रुपाली अवघडे, समाधान कांबळे, सिध्दार्थ बंदरकर, प्रशांत नंदी, जयेश भद्रीके, महेश सावंत, प्रतिक इंदुलकर, विजय गावंड, प्रतिक पाटेकर, गणेश चौगुले व रुपाली अवघडे आदींसह 20 सदस्यांनी सहभाग घेतला होता. तसेच अनिशा अवघडे हि छोटी दुर्गवीर हि मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती.

या आधी किल्ल्यावर काही मोजकेच लोक भेट देत असत. पण गेल्या काही मोहीमांपासून प्रत्येक रविवारी दोन ते तीन समूह तरी या आडवाटेवरीला गडाला भेट देत आहेत हे निदर्शनास आले. हे पाहून मनाला समाधान मिळाले. अपरिचित गडकोटांचे संवर्धन, जतन त्याचबरोबर या अपरिचित किल्ल्यांचे महत्त्व लोकांना पर्यंत पोहोचावे हा दुर्गवीर प्रतिष्ठान ने घेतलेला वसा आणि या प्रयत्नाला हळूहळू यश मिळत आहे.

- प्रशांत राजाराम डिंगणकर, सभासद, दुर्गवीर प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com