राजापूर तालुक्यातील श्रीदेव माणेश्‍वर मंदिर तलावाचा श्रमदानाने उपसा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

राजापूर - तालुक्‍यातील चव्हाणवाडी येथील श्रीदेव माणेश्‍वर मंदिराच्या तलावामध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाचा वाडीतील तरुणांनी श्रमदानातून उपसा केला. या तलावातून सुमारे सात-आठ ट्रॉली गाळाचा उपसा झाला असून गाळ उपशाचा उपक्रम राबवून तरुणांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.  

श्री देव माणेश्‍वर मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या तलावामध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला होता. तलावातील गाळाचा उपसा आणि तलावाची साफसफाई करण्यासाठी गेल्या काही वर्षामध्ये कोणी फारसा पुढाकार घेतला नव्हता. त्यामुळे चव्हाणवाडीतील तरुणांनी तलावातील गाळ उपसा करून तलावाची स्वच्छता आणि साफसफाई करण्याचा निश्‍चय केला.

त्यातून महेश चव्हाण, सत्यवान चव्हाण, नवनाथ चव्हाण, विलास नवलू, ओंकार चव्हाण, बापू चव्हाण, एकनाथ चव्हाण, प्रकाश तांबे, प्रणय बाणे, जितू नवलू, मनीष चव्हाण, सोहम रायकर, अनंत चव्हाण, प्रकाश बाणे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासह अन्य सहभागी तरुणांसह ग्रामस्थांनी मदिराच्या येथील तलावाची साफसफाई केली. श्रमदानातून केलेल्या या साफसफाईतून सुमारे सात-आठ ट्रॉली गाळाचा उपसा करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mud excavation from Shree Deva Maneshwar Temple pond in Rajapur Taluka