Mumbai-Goa Highway I मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खेड येथे मुंबईकडे जात असताना एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात कारचालक किशोर अनंत चव्हाण (४८ धामापूर संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात खेड तालुक्यात खवटी रेल्वेब्रिजजवळ आज पहाटे तीनच्या सुमारास झाला.

हेही वाचा: NCPचे कार्यकर्ते आक्रमक, केतकी चितळे समर्थनात सदाभाऊंचा यू-टर्न

गाडीचा चालक किशोर वसंत चव्हाण (वय ४८, रा. धामापूर, ता. संगमेश्वर) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या आयशर गाडीला मागून धडक दिली. अपघातामध्ये चालक किशोर वसंत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या अपघातात क्वालीस गाडीमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.

यामध्ये सनम चव्हाण (वय १२), हर्षदा चव्हाण (वय ४०), संतोष चव्हाण (वय ५५), रितिका चव्हाण (वय १६), सार्थक चव्हाण (वय १४), स्मिता चव्हाण (वय ५०), स्नेहा कर्वे (वय २८) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची बातमी कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये श्री. बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. या सगळ्या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरु आहेत. अपघातातील वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे.

हेही वाचा: मोठी बातमी, कार्ति चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर CBI चा छापा

Web Title: Mumbai Goa Highway Accident Driver Of Car Is Dead Near Khed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top