CBI Raid Karti Chidambaram I मोठी बातमी, कार्ति चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर CBI चा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cbi Raid

कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरित्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे.

मोठी बातमी, कार्ति चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर CBI चा छापा

बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता ही धडक कारवाई केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरित्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने यासंदर्भात कार्ती चिदंबरम आणि वडील पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओरिसा येथील सुमारे 9 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या जोरबाग आणि चेन्नई येथील निवासस्थानावरही छापे टाकले आहेत.

हेही वाचा: दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती ठेवल्यानं तणाव; नीमचमध्ये कलम १४४ लागू

सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, 'मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? एक रेकॉर्ड असावा. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, केंद्रीय तपास यंत्रणेने 2010-14 मध्ये गैरप्रकारे परदेशी निधी मिळवल्याचा आरोप करत कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सध्या कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरु आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हे प्रकरणांत अशांचा समावेश आहे. हा परदेशी निधी त्यांचे वडील पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना कार्ती यांना मिळाला होता. सीबीआयने 15 मे 2017 रोजी INX मीडियाविरोधात एफआयआर नोंदवला होता.

हेही वाचा: हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची 'बोबडी वळली'

INX मीडिया समूहाकडून 2007 मध्ये विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (FIPB) मंजुरीमध्ये अनियमित व्यवहार करून 305 कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळवले असल्याचा आरोप आहे. कंपनीला परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हा पी. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते.

हेही वाचा: सोमय्यांच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे, असली कोण, नकली कोण?

Web Title: Cbi Raid In P Chidambaram In Fresh Cases Of Son Karti Chidambaram In 9 Location

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top