खुशखबर :‘नडगिवे घाट’ झाला अपघातमुक्‍त.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai - Goa Highway free Accident In Kharepatan Kokan Marathi News

चौपदरीकरणामुळे नडगिवे घाट सुरक्षित..अपघातमुक्त शक्‍य; १३ डेंजर स्पॉट इतिहासजमा; वाहनचालकांमध्ये समाधान....

खुशखबर :‘नडगिवे घाट’ झाला अपघातमुक्‍त..

खारेपाटण (सिंधुदूर्ग:) :  मुंबई - गोवा महामार्गावरील प्रमुख १३ डेंजर स्पॉटमध्ये समाविष्ट असलेला ‘नडगिवे घाट’ महामार्ग चौपदरीकरणात  अपघातमुक्‍त झाला आहे. तीव्र उतार आणि वळणावळणांचा घाटमार्ग चौपदरीकरणात अत्यंत सुरक्षित झाल्याने वाहन चालकांतूनही समाधान व्यक्‍त होत आहे.
मुुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना खारेपाटण लगतच्या नडगिवे घाटमार्गाचा अंदाज येत नसे.

अत्यंत वळणाचा मार्ग असल्याने अवजड वाहने अनेकदा कलंडत असत. याखेरीज आराम बस देखील महामार्गाच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त होत असत. चौपदरीकरण होण्यापूर्वी दरवर्षी ५० ते ६० अपघात या नडगिवे घाटामध्ये होत असत; मात्र या घाटमार्गातील चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर अपघाताचा धोका पूर्णतः टळला आहे.एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी असा हा घाटमार्ग होता. या घाटातील कोल्ह्याची मोरी हे हमखास अपघाताचे ठिकाण ठरले होते.

हेही वाचा- ग्रामस्थांच्या एकीने सुटला हा मोठा प्रश्न....

दरवर्षी ५० ते ६० अपघात

गोव्यावरुन येताना तीव्र उतार व जवळपास काटकोनात वळणारा रस्ता यामुळे चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता येत नसे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका मिळालेल्या केसीसी बिल्डकॉनच्या अभियंत्यांनी डोंगराचा भाग समतल केला. तर कित्येक टन माती ओतून दरीचा भाग भरून काढला. गेली दोन वर्षे नडगिवे घाट सरळ करण्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाल्यामुळे दोन्ही बाजूंच्या मार्गिकेतून वाहने निर्धोकपणे जात आहेत.

हेही वाचा- रत्नागिरी जिल्हा परिषद आढावा बैठकीत ही चुक आली समोर

९० टक्के काम पूर्ण
नडगिवे घाटमार्गाच्या संरक्षक भिंतीचे काम अजून शिल्लक आहे. मे अखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी ग्वाही केसीसी बिल्डकॉनच्या अभियंत्यांकडून देण्यात आली. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण ते झाराप या दरम्यान चौपदरीकरणाचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले असून तळेरे, नांदगाव, कासार्डे, कणकवली आणि कुडाळ या शहरांतील काही काम शिल्लक आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्णत्वास जाणार असल्याची ग्वाही महामार्ग अधिकाऱ्यांनी दिली आहे.