३१ मे २०२६ची डेडलाईन संपली, तरी मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी; गडकरींचे आश्वासन हवेतच

Mumbai Goa Highway News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग ३१ मेपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. पण अद्याप कामं अपूर्ण असून या पावसाळ्यात ती पूर्ण होण्याची चिन्हे नसल्याचं दिसून येतंय.
Mumbai-Goa Highway Misses Third Completion Deadline

Mumbai-Goa Highway Misses Third Completion Deadline

Esakal

Updated on

चिपळूण, ता. ३१ : मुंबई-गोवा महामार्ग ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात दिले होते. मंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी ३१ मे पूर्वी काम पूर्ण करण्यासाठी हवा निर्माण केली. मात्र, ३१ मे उजाडला तरी महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास खडतरच होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com