मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण

तुषार सावंत
Friday, 31 July 2020

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली शहरांमध्ये 45 पिलर ओवर ब्रिजचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे.

कणकवली  (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडत असताना आज अखेर या कामाचा एकूणच पर्दाफाश झाला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या ओवर ब्रिज चा भाग कोसळल्यामुळे कणकवलीत अक्षरश दाणादाण उडाली आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.

महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा एकदा उघड झाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील उड्डाणपुलाचा काही भाग आज सकाळी १०.२० च्या दरम्यान कोसळला. सुदैवाने त्यावेळी महामार्गावरून वाहतूक सुरू नसल्याने जीवित हानी टळली. महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच उड्डाणपूल कोसळला असल्याने महामार्ग चौपदरीकरण किती वर्षे टिकणार असा प्रश्न शहरवासीयातून उपस्थित होत आहे.

 

हेही वाचा-आर्थिक तंगीमुळे  ७० टक्के मच्छीमार घरीच बसणार... कोकणात कुठे आहे हे विदारक चित्र... वाचा -

यापूर्वी शहरातील एस एम हायस्कूल भागात उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली होती त्यानंतर आज उड्डाणपुलाचा काही भाग सर्विस रस्त्यावर कोसळला आहे.कणकवली शहरात येथे उड्डाणपूल कोसळला तेथील गर्डर आणि स्लॅबचे काम चार महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते. आज सकाळी  अचानक गर्दर आणि त्यावरील स्लॅब कोसळल्याने कणकवलीकरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा- गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्गातील यंत्रणा अलर्ट -

कणकवली शहरात एस एम हायस्कूल ते गड नदी पर्यंत 44 पिलर उभारून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल या दरम्यान बॉक्स बॉर्डर बांधलेले काम चार महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. पुलावर स्लॅब घातल्यानंतर त्या खालील सपोर्ट काढन्यात आले आणि सेवा रस्त्यावरून वाहतूक देखील सुरू करण्यात आली होती. महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र त्याकडे हायवे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयातून व्यक्त होत आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Goa Highway over bridge collapse of part in kankavli