Heavy traffic on Mumbai-Goa Highway before monsoon
esakal
Mumbai-Goa Highway Traffic Congestion Today : उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गर्दी अधिक वाढत असल्याने वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.