मुंबई-गोवा जलवाहतुकीचा आराखडा पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या सागरी वाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदर िवकासामुळे कोकणात मालवाहतूकही वाढेल. मुंबई-गोवा जलवाहतुकीचा बृहत्‌ आराखडा पूर्ण झाला असून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. 

सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणाऱ्या सागरी वाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदर िवकासामुळे कोकणात मालवाहतूकही वाढेल. मुंबई-गोवा जलवाहतुकीचा बृहत्‌ आराखडा पूर्ण झाला असून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. 

बंदरांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राकडून मदत मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. बंदरांच्या विकासासाठीही हालचाली सुरू असून मार्च महिन्यापासूनच जलवाहतुकीचा आनंद पर्यटकांच्या बरोबर कोकणवासीयांना घेता येईल, अशी माहिती बंदर अधीक्षक (मुंबई) प्रदीप बढिये यांनी दिली. शासनाने मुंबई-गोवा जलवाहतुकीस १ डिसेंबर २०१६ ला परवानगी दिली. या वाहतुकीने मुंबई- गोवा महामार्गाला हा पर्याय निर्माण होईल. कोकणच्या प्रगतीला वेग प्राप्त होईल. गेट वे ऑफ इंडिया ते जंजिरा, रेवदंडा, जयगड, पूर्णगड, विजयदुर्ग, मालवण, गोपाळगड यासारख्या सागरी किल्ल्यांच्या दर्शनाचा आनंद पर्यटकांना मिळू शकेल. 

कोकणवासीयांकडून  कित्येक वर्षे बंदरांचा विकास करा, अशी ओरड सुरू असली तरी त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची गरज होती. तो मिळवण्यासाठी कोकणातील नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या पर्यटनाला सागरी वाहतुकीची जोड मिळाल्यास कोकणला आणखी समृद्धी मिळू शकते. कोकणात कोकण रेल्वे आल्यानंतर कोकण आणि मुंबईचे नाते घट्ट झाले. कोकण किनारपट्टीला रेल्वेचा फायदा इतकासा झालेला नाही. कोकणातील उद्योग व्यवसायाबरोबर पर्यटनाच्या वाढीसाठीही हे सकारात्मक पाऊल आहेत. 

बंदर विकासामध्ये गोव्याच्या धर्तीवर मासेमारीच्या जेटी आणि प्रवासी जेटी एकच करणे गरजेचे आहे. प्रवासी बोटींबरोबर निव्वळ पर्यटनासाठी डेक्कन ओडिसी रेल्वे गाडीच्या धर्तीवर एका पर्यटन बोटीसाठी प्रयत्न करणार आहे. 
- उदय सामंत, आमदार, रत्नागिरी

कोकणामध्ये जयगड, तवसाळ, दाभोळ, धोपावे, बागमंडले येथे जलवाहतूक करणारी सुवर्णदुर्ग शिपिंग ॲण्ड मरीन कंपनी ही मुंबई ते जयगडपर्यंत दिघे, हर्णै, दाभोळ, जयगडपर्यंत प्रवासी वाहतूक करणार आहे. वेराज लॉजिस्टिक शिपिंग कंपनी गोव्यापर्यंत सैर करणार आहे.

Web Title: Mumbai-Goa water transport scheme completed