ब्रेकिंग - मंडणगडमध्ये सापडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...

a mumbai return men report for corona positive in mandangad
a mumbai return men report for corona positive in mandangad

मंडणगड (रत्नागिरी) : लॉक डाऊनमध्ये मुंबईतील अंधेरी परिसरातून मंडणगड तालुक्यातील आपल्या गावी तिडे-तळेघर येथे पायी चालत आलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असणाऱ्या मंडणगड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली असून प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे सदरच्या व्यक्तीत कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसल्याची बाब पुढे आली आहे. रात्रीच त्या व्यक्तीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे आयसोलेशन सेंटरला पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा- अखेर तळीरामांच्या संयमाचा बांध फुटला ; दारू दुकानांवर तोबा गर्दी...
  मंडणगड तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासन कार्यरत आहे. अनेक उपाययोजना करीत जागरूकता व सतर्कता निर्माण करत आहे.  मात्र तालुक्यातील तळेघर येथील मुंबईत वास्तव्याला असणारी एक व्यक्ती आपल्या एका मित्रासमवेत गावाकडे आली. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल मार्गे महाडपर्यंत या दोन व्यक्ती आल्या. महाड येथून पायी चालत आडमार्गाच्या पायवाटेने आपल्या गावांत आल्याचे पुढे येत आहे. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे गावातील ग्रामस्थांनी मुंबईतून आलेल्यांची माहिती प्रशासनाला कळविली. त्यानंतर त्यांना मंडणगड येथे विलगिकरण कक्षात ता.२९ एप्रिल पासून कोरोन्टाईन करण्यात आले.

तालुक्यातून कोरोन्टाईन केलेल्या २५ जणांचे स्वॅब तपासणी करीता मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्यातील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने येथील प्रशासनाला दिलासा मिळाला. मात्र तो फार काळ टिकला नाही. काही तासांनी रविवारी रात्री आलेली बातमी तालुका प्रशासनाची झोपच उडवणारी ठरली. एकाचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याने यंत्रणा आणखी सतर्कतेने कार्यरत झाली आहे. तालुक्यातील प्रवेशद्वारावर चेक पोस्ट लावण्यात आल्याने बाहेरून येणारे काही नागरिक आडवाटेने आपल्या गावात जात आहेत. मात्र गावांतून जागरूकता निर्माण झाल्याने त्यांना शहरातील विलगिकरण कक्षात कोरोन्टाईन व्हावे लागत आहे. मात्र असा मार्ग अवलंबल्याने बाहेरून येणाऱ्या व्यक्ती स्वतःसह अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत आहेत. कोरोना बाधित ही व्यक्ती गावांतील घरात वावरली असल्याने प्रशासनाने संपर्कात आलेल्या काहींना कोरोन्टाईन केले आहे. तसेच परिसर सील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com