Mumbai-Konkan Ro-Ro Service
esakal
कणकवली : मोठा गाजावाजा करून गतवर्षी मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा सुरू झाली. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने ती बारा फेऱ्यांतच बंद पडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई ते वेंगुर्ले रो रो सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही सुरू केली (Mumbai Vengurla Water Transport) आहे. यात मालवण आणि वेंगुर्ले येथे या सेवेला थांबे प्रस्तावित केले आहेत. रो रो सेवा चालविण्यासाठी चार कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. रो रो सेवेचे तिकीट दर आवाक्यात राहिले, तर १९८८ नंतर बंद झालेली मुंबई ते कोकण ही जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.