गुहागर तालुक्यातील पिंपर मठवाडीत खूनाची घटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गुहागर - तालुक्‍यातील पिंपर मठवाडी येथील अनंत विश्राम देवळे (वय 49) यांचा खून झाला. काल (ता. 13) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. कोयत्याने डोक्‍यात ताकदीने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत देवळे यांच्या पत्नी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपासून ते मुलगी साक्षी व मुलगा वेद यांच्यासह गावी राहत होते. या घटनेने पिंपर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पिंपर येथील घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनंत देवळे काल रात्री साडेदहाला झोपले. मुलगी शाळेत जात असल्याने नेहमीच ते पहाटे पाचला उठत असत. आज सकाळी घड्याळाचा गजर सुरू होता. मात्र, वडील उठले नाहीत म्हणून मुलगी त्यांना उठविण्यास गेली. त्यावेळी ते खोलीत दिसले नाहीत. मात्र, घराचे मुख्य दार उघडे होते. त्यामुळे वडील बाहेर गेले असतील, असे समजून मुलीने थोडावेळ वाट पाहिली. मात्र, बराच वेळ झाला तरी वडील न आल्याने साक्षीने मुंबईत आईला फोन केला. आईने पिंपरला राहणाऱ्या अनंत देवळे यांच्या बहिणीला याबाबत सांगितले.

त्यानंतर ग्रामस्थांनी घर परिसरात शोध सुरू केला असता घराच्या मागील बाजूला भिंतीला लागून अनंत देवळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तातडीने पोलिसपाटील धर्वे यांनी ही माहिती पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर लगेचच पोलिस निरीक्षक अरविंद बोडके, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव घटनास्थळी आले. त्या वेळी अनंत देवळेंच्या कपाळावर तीन आडवे वार व मागील बाजूस एक मोठा वार केल्याचे आढळून आले. मागील वारामुळे डोक्‍याला मोठे छिद्र पडले होते. तसेच, शरीरावर अन्यत्रही वार केल्याच्या तसेच मारहाण केल्याच्या खूणा होत्या. तातडीने पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी श्‍वानपथकही मागविले होते. मात्र, अद्यापही खुनाचे कारण गुलदस्त्यात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence in Pimper Mathawadi in Guhagar Taluka