पोलिस नसल्याने नाक्‍याला सुटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

अजब कारभार - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दारू माफियांची चांदी

दोडामार्ग - महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वीजघर येथे असलेला पोलिस तपासणी नाका तीन- चार दिवस पोलिस कर्मचाऱ्यांअभावी बंद होता. नाक्‍यावर पोलिसच नसल्याने वाहनचालकांसाठी मात्र नाका सताड खुला होता. त्याचा फायदा गोव्यातून घाटमाथ्यावर दारू नेणाऱ्या आणि घाटमाथ्यावरून गोव्याकडे खडी वाहून नेणाऱ्या डंपरचालकांनी उठवला. नेहमीपेक्षा जास्त डंपर या मार्गावरून धावत होते. पोलिस तपासणी नाक्‍यावर मात्र शुकशुकाट होता.

वीजघर येथील नाक्‍यावर अनेकदा बेकायदा घाटमाथ्यावर नेली जाणारी दारू पकडण्यात आली आहे. खासगी वाहनांबरोबर एसटी गाड्यांमध्येही गोवा बनावटीची दारू सापडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे तो नाका संवेदनशील मानला जातो. शिवाय याच गेटवरून अनेक अवजड वाहने येजा करतात. त्यात विनापरवाना किंवा परवान्यापेक्षा अधिक क्षमतेची खडी वाहतूक करणारे डंपर सर्वाधिक असतात. पोलिसांच्या आशीर्वादाने ते तेथून सहज पास होतात. पुढे गेल्यावर त्यांच्यावर महसूलकडून कारवाई होते, त्यावरून त्या गेटवर काय घडत असावे, याची कल्पना यावी. एकूण काय तर गेले चार-पाच दिवस पोलिसांविना असलेला वीजघरचा तपासणी नाका अवैध कामे करणाऱ्यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कुमक
या संदर्भात पोलिस विभागाशी संपर्क साधला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगड, मुंबई दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातून पोलिस कुमक मागविली होती. यासाठी येथून अनेक कर्मचाऱ्यांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले, तसेच अपुऱ्या पोलिस बळामुळे वीजघर येथील नाका बंद राहिला. अपुरी संख्या कामकाजात अडथळा निर्माण करते. त्यामुळे पोलिसांची संख्या शासनाने वाढवायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Web Title: naka close about police not here