esakal | ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी 
sakal

बोलून बातमी शोधा

nanar supporters challenge Shiv Sena

नाणार रिफायनरी विरोधासाठी रण पेटविणाऱ्या शिवसेनेला मात्र, त्याच नाणारच्या मुद्‌द्‌यावरून पडलेल्या दुफळीचा सामना करावा लागत आहे. नाणारवरून सेनेंतर्गत डाव - प्रतिडाव टाकले जात असून त्यातून पदाधिकारी आणि शिवसैनिक एकमेकांची कोंडी करीत आव्हान - प्रतिआव्हान देत आहेत.

...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - नाणार रिफायनरी विरोधासाठी रण पेटविणाऱ्या शिवसेनेला मात्र, त्याच नाणारच्या मुद्‌द्‌यावरून पडलेल्या दुफळीचा सामना करावा लागत आहे. नाणारवरून सेनेंतर्गत डाव - प्रतिडाव टाकले जात असून त्यातून पदाधिकारी आणि शिवसैनिक एकमेकांची कोंडी करीत आव्हान - प्रतिआव्हान देत आहेत. या साऱ्या घडामोडीतून सेनेमध्ये संघर्षाची ठिणगीही पडली आहे. 

हे पण वाचा - महावितरणचा प्रामाणिकांना शॅाक; तर धनिकांवर फिदा

नाणारच्या मुद्‌द्‌यावरून शिवसेनेने त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती. गेल्या काही दिवसांपासून सेनेमध्येच नाणारवरून परस्परविरोधी मतप्रवाह निर्माण झाल्याने विरोधकांची कोंडी करणाऱ्या शिवसेनेमध्ये अंतर्गत बंडाळी निर्माण झाली आहे. प्रकल्पविरोधातील झेंडे आजपर्यंत खांद्यावर घेणाऱ्या सागवे विभागातील सेना पदाधिकाऱ्यांनी आता प्रकल्प समर्थनाचे झेंडे खांद्यावर घेतले आहेत. त्यातून सेनांतर्गत संघर्ष भडकला आहे. राजा काजवे यांच्यावर कारवाई करून सेना नेतृत्वाने समर्थक पदाधिकाऱ्यांना कारवाईचा सूचक इशारा दिला. मात्र सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी कारवाईच्या निषेधार्थ राजीनामे देवून थेट सेना नेतृत्वालाच आव्हान दिले. या साऱ्या घडामोडीनंतर सेनेतर्गंत खऱ्या अर्थाने डाव-प्रतिडावाचे नाट्य रंगले. एवढेच नव्हे तर पक्षांतर्गत राजकीय नाट्यामध्ये सेनेमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचा भविष्यात भडका उडणार की संघर्ष इथेच शमणार, याकडे लक्ष लागले आहे. 

हे पण वाचा - Mahashivratri 2020 - महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेल्या कुंडावर स्नान

पक्षांतील कोंडी फुटणार कशी? 
केंद्र आणि राज्यामध्ये भाजपप्रणित असलेल्या शासनाच्या काळामध्ये नाणार रिफायनरीला मंजूरी मिळाली होती. मात्र सेनेने प्रकल्पविरोधकांच्या बाजूने उभे राहून भाजपची कोंडी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून प्रकल्पाच्या भूसंपादन अधिसूचनाही रद्द करून घेतली होती. मात्र ज्या नाणार प्रकल्पाचा मुद्दा शिवसेनेने पेटविला, त्याच प्रकल्पाच्या मुद्‌द्‌यावरून सेनेमध्ये दुफळी माजली आहे. नाणार प्रकल्पावरून दुसऱ्यांची कोंडी करणारे शिवसेना नेतृत्व पक्षांतर्गत कोंडी नेमकी कशी फोडणार, याकडे लक्ष आहे. 

loading image