esakal | "ठाकरे सरकार या महिन्यापर्यंत कोसळणार"
sakal

बोलून बातमी शोधा

narayan rane press conference in malvan sindhudurg

अभिनेता सुशांत सिंगच्या हत्येचा मुद्दा मागे पडावा यासाठीच शिवसेनेची आंदोलन करण्याची भाषा

"ठाकरे सरकार या महिन्यापर्यंत कोसळणार"

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) : ठाकरे सरकार सर्वच मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीत कोणातही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट -सप्टेंबर पर्यंत हे सरकार कोसळेल असे भाकीत माजी मुख्यमंत्री खास.नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केले. 


अभिनेता सुशांत सिंगच्या हत्येचा मुद्दा मागे पडावा यासाठीच कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याची भाषा शिवसेना करत आहे. मात्र अशा आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान देण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. हिंमत असेल तर खास. संजय राऊत यांनी आमच्या सोबत यावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.


नीलरत्न निवासस्थानी श्री. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत, दिलीप रावराणे, संजय चव्हाण, राजू राऊळ, सुदेश आचरेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, बाबा परब यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- रत्नागिरीत अनुभव नसताना या दोन तरुणांनी खेचून आणले यश -


श्री. राणे म्हणाले, जिल्हा नियोजनाचा निधी सरकारने दिलेला नाही, निसर्ग चक्रीवादळावेळी जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या २५ कोटीतील एक रुपयाही अद्याप उपलब्ध झालेला नाही, कुठल्याही खात्याकडे पैसा नाही. त्यामुळे भाजपचा लोकप्रतिनिधी म्हणून या सरकारला जमेल तेवढे धारेवर धरण्याचे काम करत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने आणलेले एक काम दाखवा, साधे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री पैसे आणू शकले नाहीत. कोरोनाच्या काळात आम्ही स्वतःच्या पैशाने गरजू रुग्णांना इंजेक्शन दिली, पण त्याची कधी प्रसिद्धी केली नाही. त्याची छायाचित्रे काढली नाहीत.

हेही वाचा- त्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक ; देवेंद्र फडणवीस -

जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यासाठी मला सरकारच्या निधीची आवश्यकता नाही. लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कालच सुसज्ज लॅबचे उदघाटन करण्यात आले. याठिकाणी दीड तासात ९६ जणांचे रिपोर्ट मिळणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथे येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन करण्यास आपला विरोध असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे