युती झाली तर भाजपला 'रामराम'- राणे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार आणि जर शिवसेना आणि भाजपमध्येयुती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा युतीसोबत जाणार नसल्याचे नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युतीत शिवसेनेचा समावेश झाल्यास माझा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढेल.

सिधुदुर्ग- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती होणार आणि जर शिवसेना आणि भाजपमध्येयुती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा युतीसोबत जाणार नसल्याचे नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युतीत शिवसेनेचा समावेश झाल्यास माझा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढेल.

पुढे राणे म्हणाले की, पाच राज्यातील परभवानंतर भाजपने धडा घ्यायला हवा. भाजप कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका घेत नसल्यानेच त्यांना पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकात पराभव स्वीकारावा लागला असल्याचेही राणेंनी यावेळी म्हटले. या सरकारने त्यांच्या कार्यकाळात कुठल्याही प्रकारची आश्वासने पाळली नसल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. शिवसेना आणि भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Web Title: narayan Rane warn If the BJP And Shivsena alliance then we contest Seapratley