नरेंद्र डोंगर धबधबा : सावंतवाडीला गवसलेले नवे पर्यटन स्थळ

अमोल टेंबकर
रविवार, 23 जुलै 2017

ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्टा विकासाच्या उंबरठ्यावर  असलेल्या सावंतवाडी शहरात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडली आहे. येथील माठेवाडा भागात नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या  धबधब्यावर आज मोठी गर्दी पाहायला मिळाली.

सावंतवाडी : ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्टा विकासाच्या उंबरठ्यावर  असलेल्या सावंतवाडी शहरात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडली आहे. येथील माठेवाडा भागात नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या  धबधब्यावर आज मोठी गर्दी पाहायला मिळाली.

गटारी आणि रविवार असल्यामुळे अनेक स्थानिक नागरीकांसह पर्यटकांनी सुध्दा या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला. शहरापासून जवळच या धबधब्याच्या परिसराचा विकास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

दरम्यान पालिकेने या पर्यटन प्रकल्पाकडे लक्ष देऊन योग्य तो विकास करावा अशी मागणी माठेवाडा येथील युवा कार्यकर्ते कुणाल सावंत अब्दुल साथिया यांनी केली आहे.याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, धबधबा असलेली जागा नेमकी कोणाची आहे याची माहिती घेण्यात येणार आहे.तसेच तो भाग वनविभागाच्या हद्दीत येत असल्यास परिसराचा विकास करण्यासाठी वनविभागाची मदत घेता येवू शकते.सदयस्थितीत त्या ठीकाणी जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे अनेक नागरिक आणि पर्यटक त्या ठिकाणी भेटी देतात,.त्याचा फायदा शहरासाठी होणार आहे

Web Title: narendra waterfall sawantwadi new destination esakal news