Kankavali Police : 'त्या' तिघांकडून माझ्या जीवाला धोका; तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची पोलिस ठाण्यात तक्रार

किरण परब याने 'पंधरा दिवसांत राजीनामा न दिल्यास तुला जीवे ठार मारणार' अशी धमकी दिली.
Natal Tantamukti Samiti president Ganesh Sawant
Natal Tantamukti Samiti president Ganesh Sawantesakal
Summary

गणेश यांच्यावर हल्ला होऊन तसेच याबाबतची तक्रार नोंदवून चार दिवस झाले, तरीही मारहाण करणाऱ्या एकाही संशयिताला अटक झालेली नाही.

कणकवली : तंटामुक्ती अध्यक्षपदाचा (Tantamukti President) राजीनामा देत नसल्याच्या रागातून नाटळ-खांदारवाडी येथील तिघांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. त्या तिघांविरोधात पोलिसांत तक्रारही दिली; मात्र गेल्या चार दिवसांत यातील एकाही आरोपीला अटक झालेली नाही. त्या तिघांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी नाटळ तंटामुक्त समिती (Tantamukti Samiti) अध्यक्ष गणेश सावंत (Ganesh Sawant) यांनी केली.

याबाबतचे निवेदन त्यांनी येथील पोलिसांत दिले. गणेश सावंत यांच्यासह नाटळ येथील विश्वनाथ सावंत, संजीव सावंत, मनोज सावंत, रमेश सावंत, प्रसाद सावंत, अविनाश सावंत, सचिन सावंत, अशोक सावंत, संजय सावंत, रामेश्वर सावंत, अनिल सावंत, विलास सावंत, श्रीधर सावंत आदींनी पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Natal Tantamukti Samiti president Ganesh Sawant
Pachod Police : 17 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार; पाचोड पोलिसांत गुन्हा दाखल

यात म्हटले की, नाटळ-पांगमवाडी येथील हनुमान मंदिरनजीक सोमवारी (ता. ६) रात्री १०.३० च्या सुमारास खांदारवाडी येथीलच किशोर विठ्ठल परब, किरण किशोर परब, महेश महादेव खांदारे यांनी चिव्याचा दांडा, लोखंडी सळी आदींनी गणेश यांना मारहाण करायला सुरुवात केली. किरण परब याने 'पंधरा दिवसांत राजीनामा न दिल्यास तुला जीवे ठार मारणार' अशी धमकी दिली. या झटापटीत गणेश यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान झाले.

Natal Tantamukti Samiti president Ganesh Sawant
'शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादारला तत्काळ अटक करा'; पत्रकार संघटनांकडून 'या' घटनेचा तीव्र निषेध

त्यांच्या हनुवटीखाली, डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. त्यानंतर गणेश यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. गणेश यांच्यावर हल्ला होऊन तसेच याबाबतची तक्रार नोंदवून चार दिवस झाले, तरीही मारहाण करणाऱ्या एकाही संशयिताला अटक झालेली नाही. त्या तिघांकडून गणेश यांच्या जीवाला धोका आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी गणेश सावंत व इतर उपस्थितांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com