Pali News : नॅशनल बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पालीतील वेदांत गायकवाड ची दैदिप्यमान कामगिरी

हरियाणा सोनिपत येथे शनिवारी (ता.6) व रविवारी (ता.7) झालेल्या नॅशनल बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पालीतील वेदांत अमित गायकवाड (वय 18) या युवकाने दैदिप्यमान कामगिरी केली.
Vedant Gaikwad
Vedant GaikwadSakal

पाली - हरियाणा सोनिपत येथे शनिवारी (ता.6) व रविवारी (ता.7) झालेल्या नॅशनल बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पालीतील वेदांत अमित गायकवाड (वय 18) या युवकाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. वेदांतने बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्ण व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. वेदांतच्या या यशामुळे जिल्ह्यासह राज्याचे नावलौकिक झाले आहे.

सोमवारी (ता.8) वेदांत हरियाणा येथून रायगड जिल्ह्यात परतीच्या मार्गावर निघाला. दोन्ही स्पर्धा मिळून वेदांतने 227. 5 किलोग्राम वजन उचलले आहे.

वेदांत कोलाड येथील गीता दि. तटकरे या पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

मागील अनेक दिवसांपासून तो या स्पर्धेसाठी तयारी व कठोर मेहनत करत आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कडाक्याच्या थंडीत ही स्पर्धा खेळली व यश प्राप्त केले आहे.

त्याला या स्पर्धेसाठी वडील अमित गायकवाड व भाऊ श्रेयश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच वडील अमित व आई अरुणा यांनी प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com