कोकणात पावसाचा जोर वाढला ; नातूनगर धरण भरले ७० टक्के ....

Natunagar dam in Konkan is 70 percent full
Natunagar dam in Konkan is 70 percent full

खेड (रत्नागिरी) : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे नातूनगर धरण ७० टक्के भरले असून,  ६ जुलै अखेरपर्यंत पाण्याची पातळी ८७.५५ मीटर झाली आहे. धरणात १९.३०४ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असल्याची माहिती नातूनगर पाटबंधारे प्रकल्पाचे अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली. नातूनगर धरणा पाठोपाठ शिरवली, कोंडीवली, पिंपळवाडी धरणातही मुबलक पाणीसाठा झाला आहे.

नातूनगर धरण क्षेत्रात आतापर्यंत १११५ मि. मी. इतका पाऊस पडला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग ०.९७२ घ.मी सेकंद आहे. या धरणांतर्गत नातूनगर, बोरकर, उधळे, कळंबणी, भरणे, खेड आदी गावे समाविष्ट आहेत. खोपी - पिंपळवाडी धरणात ७० टक्के इतका पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात १४८८ मि.मी. इतका पाऊस पडला असून १८.८९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. पाण्याची पातळी १२५.८७ मीटर इतकी आहे.  सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग १९.८० घ.मी सेकंद आहे. खोपी, कुळवंडी, खेड आदी गावे धरणात समाविष्ट आहेत.

शिरवली धरणक्षेत्रात आजपर्यंत पडलेल्या ११५८ मि.मी. पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत ३.३७६ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून पाण्याची पातळी ३९.९० मीटर झाली आहे. सांडव्यावरून पाण्याचा  विसर्ग २१.५५४ घ.मी./ सेकंद आहे. या धोरणांतर्गत उधळे, भरणे, खेड आदी गावे समाविष्ट आहेत. कोंडीवली धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत ३.३६७ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात आजपर्यंत ९८९ मि.मी. इतका पाऊस पडला असून पाण्याची पातळी १२६.३० मीटर झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com