
Colorful butterflies fluttering freely in Raigad ahead of the September Butterfly Festival.
Sakal
-अमित गवळे
पाली: पश्चिम घाटाचा मोठा पट्टा, मुबलक झाडेझुडपे व निसर्ग संपदा, 240 किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, कांदळवने, अभयारण्य व पोषक वातावरण या सर्वांगीण अनुकूल परिस्थिती मुळे रायगड जिल्ह्यात रंगीबेरंगी फुलपाखरांच्या अनोख्या दुनियेचे दर्शन घडत आहे. सध्या ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरू उडताना व बागडताना दिसत आहेत. येथे येणारे पर्यटक व प्रवासी या फुलपाखरांना पाहण्यासाठी आवर्जून थांबतात.