रिफायनरीच्या समर्थनातील फलकाला राष्ट्रवादीने फासले काळे

राजेंद्र बाईत
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

राजापूर - गेल्या काही महिन्यांपासून तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरीवरून जोरदार रणकंदन पेटलेले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ आणि प्रकल्पासंबधित माहिती देणाऱ्या फलकांना आज काळे फासून रिफायनरीला कडाडून विरोध असल्याचे दाखवून दिले. यावेळी रिफायनरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना रिफायनरी हटावची मागणी करण्यात आली. 

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जोरदार रणकंदन माजले आहे. शासनाकडून या प्रकल्पाची उभारणी रेटून नेली जात असताना प्रकल्पग्रस्तांकडून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीवरून शासन आणि प्रकल्पग्रस्त एकमेकांसमोर ठाकले आहे. अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज तालुक्‍यामध्ये प्रकल्पाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या फलकांना काळे फासून या प्रकल्पाचा निषेध केला आहे.

सोल्ये भागामध्ये लावण्यात आलेल्या या फलकांना राजापूर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखले जात असलेले श्री. यशवंतराव यांनी या फलकांना काळे फासले. यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिफायनरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये रिफायनरी हटावची मागणी करताना प्रकल्प लादू दिला जाणार नसल्याचा इशारा दिला. 

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ लाड, राजापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष आणि नगरसेवक संजय ओगले, पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर, हातदेचे सरपंच बाळा चव्हाण, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नाना कोरगावकर, विभागाध्यक्ष संतोष सरवणकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष मनिष लिंगायत, श्रीधर सौंदळकर, मारुती साळस्कर, संजय गराटे, वासुदेव गराटे, संदिप सौंदळकर, भिकाजी परब, अनिल तांबे, अक्षय मोरे, रामचंद्र राऊत, प्रकाश सौंदळकर, उत्तम सौंदळकर, आत्माराम साळस्कर, अक्षय मोरे, अनिल तांबे आदी उपस्थित होते. 

एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात स्थानिक जनतेला विश्‍वासात घेतल्याशिवाय रिफायनरी होणार नाही. तर, दुसऱ्या बाजूला रिफायनरीचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी ठिकठिकाणी होर्डींग्ज लावले जात आहेत. याच्यातून एक प्रकारे राजापूरवासियांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. याचा आम्ही निषेध करतो.

- अजित यशवंतराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस  

Web Title: NCP agitation against Nanar refinery