राष्ट्रवादी  'या" माजी आमदारास सक्रिय ठेवण्यासाठी देणार जबाबदारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला करिष्मा दाखवत तिसऱ्या क्रमांकाचे आमदार निवडून आणले.

चिपळूण - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभूत आमदारांवर पक्षाची जबाबदारी देवून त्यांना सक्रिय ठेवण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्याकडे पक्षाची नवीन जबाबदारी येण्याची शक्‍यता आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला करिष्मा दाखवत तिसऱ्या क्रमांकाचे आमदार निवडून आणले. राज्यात राष्ट्रवादीला बळ मिळाले ते कायम ठेवण्यासाठी शरद पवार यांनी नुकतेच मुंबईत घेतलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना काही सूचना केल्या. एमआयएम आणि वंचित आघाडी राज्याच्या निवडणुकीत उतरली होती.

आंबोलीत पावसाचा रेकॉर्डब्रेक 

मुस्लिम समाज एमआयएमकडे फार वळला नाही. तो कॉंग्रेस आघाडीबरोबरच राहिला. मात्र, दलित समाजाची मते राष्ट्रवादीपासून दुरावली आहेत. ती पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळतील, याकडे लक्ष देण्याची सूचना पवारांनी केली आहे. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी तेथील पराभूत आमदारांना सक्रिय करून त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्याची सूचना पवारांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीचे आमदार संजय कदम यांचा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पुत्रासमोर पराभव झाला. आमदार योगेश कदम यांना कदमांनी कडवी झुंज दिली होती. पक्षबांधणीसाठी पवारांनी केलेल्या सूचनेनूसार आता संजय कदम यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नीलेश राणे यांनी भाजपला दिली ही ग्वाही 

""संजय कदम विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते मतदारसंघात सक्रिय आहेत. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी द्यावी, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, याबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेतील.'' 

 - बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस 

आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी त्यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपद दिले. जाधवांनी या पदाला न्याय देत जिल्ह्यात आणि मुंबईत पक्षबांधणी केली. पक्षाच्या कार्यालयात स्वतःसाठी कक्ष मिळवला होता. भास्कर जाधव यांच्यासारखीच धमक आणि आक्रमकता संजय कदम यांच्यात आहे. त्यांना जिल्ह्याचा प्रभारी हे पद दिल्यास गुहागर व दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीला बळ येईल. 
- सतीश उर्फ पपू चिकणे,
खेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will Give Chage to Ex MLA Sanjay Kadam