रायगड जिल्ह्यातील तीन नगरपालिकांवर राष्ट्रवादीचा झेंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 9 नगरपालिकांचे निकाल सोमवारी (ता. 28) जाहीर झाले. यामधील तीन नगरपालिकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला.

शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारीत दोन नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळवले. तर कॉंग्रेसने दोन आणि भाजप, शेतकरी कामगार पक्ष यांनी प्रत्येकी एका नगरपालिकेवर वर्चस्व प्रस्तापित केले. विशेष म्हणजे, अलिबाग पालिकेतील 17 पैकी 17 जागांवर शेकापने विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली. 

अलिबाग, पेण, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, महाड, खोपोली, माथेरान आणि उरण या नगरपालिकांसाठी रविवारी (ता. 27) मतदान घेण्यात आले होते. त्याची सोमवारी सकाळी 10 वाजता करण्यात आली. त्यामधील खोपोली, रोहा आणि श्रीवर्धनवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेकाप व कॉंग्रेसच्या साह्याने विजय मिळविला. शिवसेनेने माथेरान आणि मुरूड नगरपालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून खेचण्यात यश मिळविले. कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे पेण आणि महाड नगरपालिकांमध्ये विजय मिळविला; मात्र पेणमध्ये कॉंग्रेसला शहर विकास आघाडीने जोरदार टक्कर दिली. भाजपने उरण नगरपालिका जिंकली, तर शेकापने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार्याने अलिबागमध्ये अलिबाग शहर संघर्ष समिती आणि शिवसेनेचा धुव्वा उडवला. शेकापने या ठिकाणी 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली. 

रोह्यात तटकरेंना दिलासा 
रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे हे बंडखोरी करून रोह्याच्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले होते. तर नगराध्यक्ष समीर शेडगे यांनीही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकावीत, अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे व्याही संतोष पोटफोडे निवडणुकीच्या रिंगणात होते. बंडखोरांचे हे आव्हान तटकरेंसमोर होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष पोटफोडे यांचा अवघ्या सहा मतांनी झालेला विजय सुनील तटकरेंसाठी दिलासा देणारा ठरला.

Web Title: NCP wins three civic bodies in Raigad