दिलासादायक बातमी; रत्नागिरीतील 'त्या' १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

Negative reports of 13 people  Ratnagiri corona virus
Negative reports of 13 people Ratnagiri corona virus

रत्नागिरी - कोरोना संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्यांपैकी तेरा जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते सर्व निगेटीव्ह आले असून  ते सर्व राजीवडा-शिवखोल येथे सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे प्रशासनाने निश्‍वास सोडला आहे.

राजिवडा -शिवखोल येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला आहे. कोचिवली एक्स्प्रेसमधून त्याच्यासोबत प्रवास करणार्‍या सहप्रवाशांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यातील काही प्रवासी चिपळूण, रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यांनाही तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. दिल्लीजवळील निजामुद्दीन मरकज येथे धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्या कार्यक्रमात देशातील विविध भागातून अनेक नागरिक गेले होते. राजिवडा-शिवखोल येथील एका व्यक्तीला त्रास जाणवू लागल्यामुळे 1 एप्रिलला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो 18 मार्चला रत्नागिरी शहरात पोहचला होता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले असून त्या नऊही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. राजिवडा परिसरात आरोग्य पथकामार्फत प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरु आहे. 

जिल्हा रुग्णालयात अद्याप 25 जण दाखल असून जिल्ह्यात एकूण दाखल रुग्णांची संख्या 34 वर पोचली आहे. आतापर्यंत 109 नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील 107 नमुने निगेटिव्ह आले असून 2 जण पॉझिटीव्ह होते. त्यातीलही एकाचा नमुना निगेटिव्ह आल्याने पॉझिटीव्ह रुग्ण एकच राहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com