रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच ; आज सव्वाशे रूग्णांची वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

नव्याने सापडलेल्या 125 रुग्णांमध्ये सर्वाधिक 72 रुग्ण हे अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचे आहेत

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 125 नवे रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 53 तर अँटिजेन टेस्ट केलेले तब्बल 72 रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 057 वर पोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये सर्वाधिक 37 रुग्ण खेड तालुक्यातील आहेत. मागील चोवीस तासात कोरोनाचे जिल्ह्यात दोन बळी गेले आहेत. यामध्ये संगमेश्वर येथील 90 वर्षीय रुग्ण आणि लांजा तालुक्यातील 55 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

नव्याने सापडलेल्या 125 रुग्णांमध्ये सर्वाधिक 72 रुग्ण हे अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचे आहेत. यामध्ये खेडमधील 27 रुग्ण, गुहागर 3, चिपळूण 19, लांजातील 4 रुग्णांचा समावेश आहे. तर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये रत्नागितील 16, दापोली 2, गुहागर 8, चिपळूण 13, मंडणगड 2, लांजा तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, कोरोना बाधित असलेल्या संगमेश्वर, लांजा तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना विषाणुंमुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत 137 जणांचा बळी  गेला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. मंडणगड तालुक्यातील १, दापोलीतील २१, खेडमधील १५, गुहागरमधील ४, चिपळुण तालुक्यातील २९, संगमेश्वर तालुक्यातील १२, रत्नागिरी तालुक्यातील ४३, लांजा तालुक्यातील ४, राजापूर तालुक्यातील ८ रुग्ण आहे.

हे पण वाचाGood News : गोव्यातून महाराष्ट्रात वाहनांना आता येणे झाले सुलभ 

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण ४०५७ इतकी झाली आहे. २७०० पॉझिटीव्ह रूग्णांनी कोरोना विषाणूंवर यशस्वीपणे मात केली  आहे. ३१ ऑगस्ट अखेर एकूण २४३०७ जणांच्या स्वाब नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.५५ टक्के इतके आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्युचे प्रमाण ३.३७ टक्के इतके असल्याचे जिल्हा शासकीय रूग्णालयातून पाठविलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे पण वाचा - विसर्जनानंतरही गणेशाची होते पुनर्प्रतिष्ठापना ; आनोख्या परंपरेच हे गाव  

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 125 corona patient in ratnagiri