esakal | Good News : गोव्यातून महाराष्ट्रात वाहनांना आता येणे झाले सुलभ
sakal

बोलून बातमी शोधा

vehicles not check on check post from today's afternoon 12 pm from goa to maharashtra

आज दुपारी १२ नंतर बांदा तपासणी नाक्यावर गोव्यातून महाराष्ट्र-सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी बंद करण्यात आली आहे.

Good News : गोव्यातून महाराष्ट्रात वाहनांना आता येणे झाले सुलभ

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) : गोवा राज्याने रात्री १२ वाजल्यानंतर सर्व सीमा खुल्या केल्यानंतर महाराष्ट्र-सिंधुदुर्ग सीमा कधी खुल्या होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी  आणि नोंदणी आज सकाळपर्यंत सुरू होती. अखेर वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर आज दुपारी १२ नंतर बांदा तपासणी नाक्यावर गोव्यातून महाराष्ट्र-सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी बंद करण्यात आली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांना आता विनाअट प्रवेश सुरू करण्यात आला आहे. 

हेही वाचा - कोकणात आजी आजोबा करत आहेत शेतीत विविध प्रयोग ; आरारोटच्या लागवडीच्या खासियत...

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सीमेवरील नाक्याला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सिंधुदुर्ग मधून गोवा व गोव्यातून सिंधुदुर्ग असा प्रवास विनाअट पूर्ववत सुरू झाला आहे. त्यामुळे गोव्यात रोजगारासाठी दररोज ये-जा करणाऱ्यांना आता सोपे होणार आहे.
अजूनही महाराष्ट्र शासनाच्यावतीने अधिकृत पत्रक काढण्यात आले नसले, तरीही वाहतूक सुरु झाली आहे. संध्याकाळ पर्यंत याबाबत शासनस्तरावर अधिकृत निर्णय होईल असे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्रादेवी येथे तपासणी नाकाभेटी सांगितले. 

हेही वाचा -  शेतीला कुंपण घालायच आहे ? हा आहे घरगुती उपाय...

यावेळी त्यांनी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. गोवा राज्यात प्रवेश खुला करण्यात आल्याने सीमेवरील गोवा राज्याचे सर्व तपासणी नाके हटविण्यात आले आहेत. गोवा आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही तपासणी नाके खुले करण्यात आल्याने याठिकाणी तपासणीसाठी थांबविण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या महामार्गावरील रांगा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. नाके हटविण्यातआल्याने दोन्ही राज्यांच्या नाक्यावरील पोलीस, महसूल, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. याठिकाणी आता केवळ पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top