रत्नागिरीत आणखी 46 जणांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारी नव्याने 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात जयगड, पारसनगर, खालची आळी, हातखंबा येथे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. 
 

रत्नागिरी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात नव्याने 46 रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा- कोकण रेल्वे; विकासाच्या ‘फास्ट ट्रक’वर आता कोकण

यात जयगड येथील तब्बल 6 रुग्ण सापडले आहेत. पारसनगर येथे 1 रुग्ण सापडला आहे. खालची आळी येथे 5, हातखंबा येथे 3, झाडगाव 1, चिपळूण 1, कुवारबाव 3, चर्मालय 1, कर्ला 2, पावस 1, शांतीनगर 2, संगमेश्वर 6, मुंबई 1, आरोग्य मंदिर 1, नाचणे रोड 1, साळवी स्टॉप 1, नेवरे 1, माळनाका 4, बंदर रोड 1, सन्मित्र नगर 1, मारुती मंदिर 1, गुहागर 1, नाचणे 2 रुग्ण सापडले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 46 corona patient found in ratnagiri