esakal | ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ६६ जणांना कोरोनाची लागण तर कोरोनाने प्रसिद्ध वैद्य डॉक्टरांचा मृत्यू...
sakal

बोलून बातमी शोधा

new 66 corona positive cases in ratnagiri  corona infected death for Doctor in Ratnagiri Municipality

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ६६ जणांना कोरोनाची लागण तर कोरोनाने प्रसिद्ध वैद्य डॉक्टरांचा मृत्यू...

sakal_logo
By
राजेश कळंबटे, राजेश शेळके

रत्नागिरी : सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर माळनाका, रत्नागिरी येथील डॉ. भिडे यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. 

रत्नागिरी तालुक्यात 25, दापोली 11, कामथे 8,गुहागर 8, रायपाटण राजापूर 3 तर कळबणी,खेड येथे 7 रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 618 इतकी झाली आहे.


हेही वाचा- मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत  : उदय सामंत - 

 कोरोना झाल्याचे जाहीर केले; मात्र.....

कोविड योद्धे, परजिल्ह्यातून आलेले यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे दर दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. रविवारीही नवीन रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामध्ये रत्नागिरी- ४, दापोली- ११, कामथे- २०, गुहागर- २ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा- राजवाडे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती : अमरनाथची यात्रा रद्द होते, पंढरपूरची वारी रद्द झाली, मग हे विकतचे दुखणे का... -

प्रसिद्ध वैद्य डॉक्टरांचे निधन

 रत्नागिरीतील प्रसिध्द वैद्य रत्नागिरी पालिकेमध्ये डॉक्टर म्हणून काम केलेले चुडामणी आणि ब्रीज खेळांचे  खेळाडू प्रमोद उर्फ रघुवीर पांडुरंग भिडे (वय ७३)यांचे  कोरोना मुळे निधन  झाले आहे. गेले 4 दिवस  त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज पहाटे 2 वाजता त्याचे  निधन झाले. रत्नागिरी येथील प्रसिद्ध वैद्य म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, पुतण्या मंदार भिडे आहेत. 

संपादन - अर्चना बनगे 

loading image