कमी खर्चात, कमी वेळेत मिळवा गुंठ्याला दोनशे किलो भात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

कमी खर्चात व कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी हा प्रयोग आहे. 

पावस : कमी खर्चात व कमी वेळेत अधिकाधिक उत्पादन कातळावर मिळविण्याचा प्रयोग गोळप सडा येथील जयंत जोशी या प्रयोगशील शेतकऱ्याने केला. भाताचा पेंढा व सुका पालापाचोळा एकत्र करून केलेल्या वाफ्यावर लागवडीच्या प्रयोगातून गुंठ्याला दोनशे किलो भात मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा -  वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षीपासून ः सामंत -

भातशेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणेही आवश्‍यक आहे, हे ध्यानी घेऊन त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर गोळप सडा येथील कातळावर भातशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यापूर्वी ते रत्नागिरी येथे भातशेती करत होते. आता गोळप सडा येथील कातळावर थोडी माती टाकून प्रयोग केला. यावर्षी कमी खर्चात व कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी हा 
प्रयोग आहे. 

भाताचा पेंढा व सुका पालापाचोळा एकत्र करून त्यावर भाताची रोपे तयार केली. पेंढा आणि पालापाचोळा एकत्र करून सहा इंचांचा वाफा तयार केला. त्यावर पाणी शिंपडून भाताचे बी पेरले. वीस ते पंचवीस दिवसांत रोप तयार झाले. तरू सारथी औषधाची पहिली फवारणी रोप थोडे वरती आल्यानंतर विसाव्या दिवशी आणि दुसरी फवारणी पेरणीपासून ८० व्या दिवशी केली. कोणत्याही प्रकारचे अन्य खत वापरले नाही. यावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरांच्या विस्तारीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर -

१२० दिवस 

घराजवळील क्षेत्रांमध्ये दोन मळ्यांमध्ये दहा बाय दहा फूट मापाचा व दुसरा सहा बाय सहा फूट मापाचा वाफा तयार केला. एक बियाणे गावठी लाल तांदळाचे व दुसरे गावठी पण पांढऱ्या तांदळाचे बियाणे त्यात पेरले. त्या क्षेत्रात रोपांची वाढ चांगली झाली असून, रोपे साधारणपणे पाच ते सहा फुटांपर्यंत उंच झाली. पेरणीपासून रोपे पसवण्यापर्यंत साधारणतः १२० दिवसांचा कालावधी लागतो. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new project work in kokan farmer mr. joshi cultivated 200 kg rice in ratnagiri

Tags
टॉपिकस
Topic Tags: