नववर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील किनारे फुल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

टाबंदीनंतर मंदावलेला व्यवसाय जोमात

दापोली - नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी दापोली तालुक्‍यातील किनाऱ्यांना पसंती दिली आहे. तालुक्‍यात एकाच वेळी समुद्र पर्यटन आणि गुलाबी थंडीचा आस्वाद घेता येत असल्याने पुणे-मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कऱ्हाड, सांगली व कोल्हापूर या भागातील अनेक पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी दापोलीला विशेष पसंती देतात. नोटाबंदीनंतर काहीसा मंदावलेला पर्यटन व्यवसाय हळूहळू सावरू लागला आहे.

हॉटेल व्यावसायिकांनीही त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे. दापोलीसह मुरूड, कर्दे, पाळंदे, आंजर्ले, पाडले, केळशी आदी समुद्र किनाऱ्यावरील गावातील हॉटेल, कॉटेज, लॉजचे शनिवारपर्यंतचे (ता. 31) आरक्षण फुल झाले आहे. हॉटेल व्यवसाय तेजीत असला, तरी पर्यटनपूरक इतर व्यवसाय अद्यापपर्यंत पूर्वपदावर आलेले नाहीत.

दापोलीत गेल्या शनिवारपासून सुमारे 25 ते 30 हजार पर्यटक तालुक्‍यात दाखल झाले आहेत.

नाताळ व नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी आरक्षण केले आहे. कॅशलेस व्यवहाराचा परिणाम काही प्रमाणात जाणवत आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी झाली आहे.
- अमित कोठारी, केळशी

Web Title: New Year full of beaches to welcome dapoli