esakal | Video : चायनामधून आला हा कोरोना, पण तुम्ही त्याला घाबरू नका ना...

बोलून बातमी शोधा

nilesh morajkar singing coronaviras awareness song in  sindudurg kokan marathi news

लोकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व्हावी ,आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी  यासाठी नैतिक मोरजकर करतोय जनजागृतीचे आवाहन... 

Video : चायनामधून आला हा कोरोना, पण तुम्ही त्याला घाबरू नका ना...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : 'चायनामधून आला हा कोरोना,
                        पण तुम्ही त्याला घाबरू नका ना,
                        काही गोष्टी अगदी नेमाने पाळा,
                        मग कोरोनाला आपणच बसेल आळा'
  असे आवाहन कवितेतून केले आहे येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या नैतिक मोरजकर याने. त्याने पालकांच्या मदतीने स्वरचित कविता तयार करून केलेले जनजागृतीचे आवाहन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याच्या या कवितेला शेकडो लाईक्स मिळत आहेत.

हेही वाचा- मंडणगडात नगरपंचायत मास्क घेवून नागरीकांच्या दारी...

नैतिकने पालकांच्या  मदतीने रचली  कविता

लॉकडाऊनच्या आदेशाला लोक गांभीर्याने घेत नसल्याने पोलिसांना नाईलाजास्तव दंडुके उभारावे लागत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लोकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. प्रशासन वेळोवेळी आवाहन करूनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लोकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने नैतिक याने स्वरचित कविता केली आहे.
या कवितेत त्याने लोकांनी या आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबतही लिहिले आहे.

हेही वाचा-कोरोना मुक्त गाव करायचा आहे मग करा हे उपाय....

सोशल मीडियावर धुम

'प्राण्यांना तुमच्यापासून ठेवा जरा दूर,
आपापसात अंतर ठेवा भरपूर,
इकडे-तिकडे फिरण्याची करू नका घाई,
नाहीतर आपली चूक, आपल्याला संकटात नेई'

सोशल मीडियावर कवितेचे सादरीकरण कौतुकास्पद ठरत आहे. शालेय विद्यर्थ्याच्या या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा व लॉकडाऊनच्या कालावधीत घरीच थांबावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.