esakal | रत्नागिरीवर कोरोनाकाळात अस्मानी संकट; राणे गरजवंतांना पुरवणार 'ऑक्सिजन'
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीवर कोरोनाकाळात अस्मानी संकट; राणे गरजवंतांना पुरवणार 'ऑक्सिजन'

रत्नागिरीवर कोरोनाकाळात अस्मानी संकट; राणे गरजवंतांना पुरवणार 'ऑक्सिजन'

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी कोरोना (ratnagiri district) आणि तौक्ते चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) आपत्तीत वातावरणात आहे. अशावेळी रत्नागिरीकरांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी मदत करायला तयार आहोत असे आश्वासन भाजपा (BJP) प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिले. कोरोना काळात गरज असलेला ऑक्सिजन पुरवठा, एम. डी. फिजिशियन डॉक्टर, कोरोनासेंटर सह पुरवण्यात येणार असल्याचे सांगितले.

भाजपाचे आमदार प्रसाद लाड, (prasad lad) माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासह परकार हॉस्पिटलचे डॉ. मतीन परकार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची आज भेट घेऊन कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळतील हानी याबाबत चर्चा केली. यावेळी दापोलीपासून राजापूरपर्यंत कोरोना केअर सेंटर, कॉन्ससेन्ट्रटर तसेच ऑक्सिजनची (oxygen) गरज पूर्ण करण्यासाठी एकत्रित काम करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपलब्ध कॉन्ससेन्ट्रटर तसेच ऑक्सिजन टँकरची उपलब्धता करून दिली.

हेही वाचा: 'देवेंद्र फडणवीस यांच्या भीतीपोटी हे सरकार कोकणातील जनतेला निश्चितच मदत करणार'

गेली काही वर्षे रत्नागिरीची आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राज्यकर्त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. गेले वर्षभर कोरोना काळात याचे परिणाम सामान्यांनी सहन केले आहेत. कोरोनावर इलाज करण्यासाठी आवश्यक एम. डी. फिजिशियन डॉक्टर ही उणीव रत्नागिरी जिल्ह्याला कायम आहे. यावर मंत्री खासदारांनी केवळ आश्वासने दिली आहेत. मात्र आज निलेश राणे यांनी जिल्ह्यासाठी एम डी फिजिशियन उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. याशिवाय अजून 3 डॉक्टर जिल्हा सेवेत रुजू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी यांना स्पष्ट केले.

याशिवाय तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नुकसानीचे पंचनामे करून मदत पोहोचण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी वीज पुरवठा अद्यापही पोहोचला नसताना लोकांचे पाण्याअभावी, विजेअभावी होणारे हाल मांडताना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीची माहिती दिली. महामार्गाच्या परिस्थितीबाबत बोलताना निलेश राणे यांनी लांजा येथील हँग कंपनीच्या गलथान कामाची माहिती देताना लांजात अपघात होत असून याकडे जातीने लक्ष द्या अशीही मागणी केली.

हेही वाचा: कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्यांची काळजी घेणार योगी सरकार

आपत्तीच्या काळात राजकारण बाजूला ठेऊन काम करत असतो. प्रशासनाला आमचे संपूर्ण सहकार्य असते आणि राहील मात्र प्रशासनानेही तितक्याच जबाबदारीने सामान्यांचे जीवन सुरळीत होईल यासाठी तात्काळ पाऊले उचलली पाहिजे असेही स्पष्ट शब्दात त्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सांगितले.

loading image