राजन साळवींना राणेंची क्‍लीन चीट?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या लांजा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे सरचिटणीस डॉ. नीलेश राणे यांनी खासदार राऊत व आमदार सामंत यांच्यावर चौफेर टीका केली. मात्र, राजापूर मतदारसंघात स्वाभिमानच्या मेळाव्यात आमदार साळवींबाबत शब्दही न काढल्याने त्यांना क्लीन चिट काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

लांजा - लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागताच शिवसेना विरुद्ध स्वाभिमान पक्ष या दोहोंमध्ये वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या लांजा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे सरचिटणीस डॉ. नीलेश राणे यांनी खासदार राऊत व आमदार सामंत यांच्यावर चौफेर टीका केली. मात्र, राजापूर मतदारसंघात स्वाभिमानच्या मेळाव्यात आमदार साळवींबाबत शब्दही न काढल्याने त्यांना क्लीन चिट काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मोठा मेळावा लांज्यात झाला. यावेळी नीलेश राणे यांनी शिवसेना पक्षावर टीकास्त्र सोडता खासदार राऊत, आमदार सामंत यांना टीकेचे लक्ष्य केले. राऊत यांनी कोणता विकास केला. या खासदारामुळे मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले आहे. सभागृहामध्ये एखाद्या विकासात्मक प्रश्नावर चर्चा करताना पाहिलेले नाही. इंग्रजी बोलता येत नाही. हिंदी, मराठी तर हे महाशय काय भारी बोलतात? विचारू नका, असा टोलाही त्यांनी हाणला. आमदार सामंत रत्नागिरीला लुटत असल्याचा आरोप केला.

वेगळाच राजकीय निशाणा 
सुमारे पाऊण तासाच्या भाषणामध्ये आमदार साळवी यांच्यावर टीका टाळली. स्वाभिमानचा मेळावा राजापूर मतदारसंघात व टीकेचे लक्ष्य रत्नागिरीचे आमदार. यामुळे राणे यांनी वेगळाच राजकीय निशाणा साधल्याचे म्हटले जाते.

Web Title: Nilesh Rane clean chit to Rajan Salvi