पगार घेतल्याचे दमानियांनी सिद्ध करावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

रत्नागिरी - खंबाटा कंपनीचा पगार घेऊन नीतेश राणेच काम करणारे कामगार होते, असे अंजली दमानियांनी सिद्ध करून दाखवावे. त्या कामगारांच्या बॅंक खात्याची डिटेल्स दाखवली, तर त्यांना बरखास्त करू, असे ठाम मत स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी व्यक्‍त केले.

रत्नागिरी - खंबाटा कंपनीचा पगार घेऊन नीतेश राणेच काम करणारे कामगार होते, असे अंजली दमानियांनी सिद्ध करून दाखवावे. त्या कामगारांच्या बॅंक खात्याची डिटेल्स दाखवली, तर त्यांना बरखास्त करू, असे ठाम मत स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी व्यक्‍त केले.

रत्नागिरीतील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानियांनी नीतेश राणेंसह नीलेश राणेंवर आरोप केले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना नीलेश म्हणाले, दमानिया कोणावरही आरोप करत सुटतात. खंबाटा प्रकरणात दोन हजार ७०० कामगार देशोधडीला लागले. त्यातील अवघे ८०० पेक्षाही कमी कामगार दमानियांबरोबर आहेत. सगळे कामगार दमानियांवर विश्‍वास का ठेवत नाहीत? त्यांच्यावर विश्‍वास असता, तर एकही कामगार आमच्याकडे आला नसता. दमानियांनी नीतेश राणेंवर फक्‍त राजकारण केल्याचा ठपका ठेवला; परंतु पैशाची अफरातफर केल्याचा आरोप शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यावर केला आहे. 

महाराष्ट्र समर्थ संघटनेचे कामगार खंबाटाच्या पगारावर होते, असे कोणीही दाखवून दिले, तर आम्ही त्यांना तत्काळ बरखास्त करू. दमानियांनी त्या कामगारांची बॅंक खाती दाखवावीत. त्यांच्या खात्यात खंबाटाकडून आलेली रक्‍कम जमा झाल्याचे स्पष्ट करावे, राऊतांनी कामगारांच्या शेवटचा हप्ता स्वतःकडे ठेवला. त्याची कागदपत्रेही दमानियांनी दाखवली आहेत; परंतु नीतेश यांचे कामगार खंबाटाचा पगार घेतात याची माहिती त्यांनी सादर केलेली नाही. ती केली तर आम्ही त्याची गंभीर 
दखल घेऊ.

२०१९ ला ‘उदय’च अस्त करू
सामंत यांनी मागील खासदारकीच्या निवडणुकीत भरीव मदत केली असती, तर ते स्वतः पक्ष बदलून राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले नसते. राष्ट्रवादीत पडण्याची भीती होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत ‘उदय’च अस्त करण्याची जबाबदारी माझी आहे, असे नीलेश यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Nilesh Rane comment