esakal | निवडणुकीच्यावेळी "तो केम छो वरळी" विचारणारा आमदार कुठे आहे?
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्यावेळी "तो केम छो वरळी" विचारणारा आमदार कुठे आहे?

निवडणुकीच्यावेळी "तो केम छो वरळी" विचारणारा आमदार कुठे आहे?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) तडाखा कोकणसह, (kokan) किनारपट्टीवरील भागाला बसला आहे. मुसळधार पाऊस (heavy rain) आणि वाऱ्याच्या 120 किलोमीटर वेगामुळे किनारपट्टीवरील लोकांना धडकी भरली. या वातावरणात सोसोट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. शिवाय अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कोट्यावधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान चक्रीवादळ पुढे सरकल्याने सोमवारी मुंबईत (mumbai) जोरदार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याने झाडे उन्मळून पडली. परिणामी रस्त्यावरील वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रॅकवर (railway track) झाडे पडल्याने लोकल वाहतूक रखडली होती. चक्रीवादळाच्या या काही मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारवर (state government) टीका केली आहे.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळात कळंबटे आजोबा ठरले हिरो, जीव धोक्यात घालून वाचवला नातवाचा प्राण

भाजपा नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thakre) यांच्यावर निशाना साधला आहे. हा व्हिडीओ मुंबईमधील वरळीतील (varoli) आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा हा व्हिडीओ आहे. यात निलेश राणे म्हणाले, 'हे चित्र वरळी मतदार संघाचे आहे. वरळीकर विचारतात की, "तो केम छो वरळी" विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही' असे म्हणत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये नागरिक गुडघाभर पाण्यातून जाताना दिसत आहेत.

दरम्यान चक्रीवादळाचा मुंबईसह सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. काही जिल्ह्यातला पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी मदत कार्य वेगाने सुरू ठेवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thakrye) यांनी दिले आहेत.