esakal | वाघ बकरी चहा आणि टायगर बामसुद्धा येतो; राणेंचे राऊतांवर टीकास्र
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ बकरी चहा आणि टायगर बामसुद्धा येतो; राणेंचे राऊतांवर टीकास्र

वाघ बकरी चहा आणि टायगर बामसुद्धा येतो; राणेंचे राऊतांवर टीकास्र

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chamdrakant patil) यांनी काल पुण्यात केले होते. त्यावर वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उत्तर दिले आहे. वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्र (north maharashtra) दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. दरम्यान खासदार राऊत यांच्या या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे. यावर भाजपचे निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करुन त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

ते म्हणाले, नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. हे त्यांनी समजून घ्यावे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील पुणे येथे म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. अशा प्रतिक्रीयेत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती.

हेही वाचा: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची!- राऊत

loading image