esakal | 'अनिल परब यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू'; राणेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

'अनिल परब यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू'

'अनिल परब यांच्यावर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : जिल्ह्यातील किनारी भागात व्यावसाय करायला पुढे येणार्‍या अनेक तरुणांना परवाने नाकारले जातात; मात्र पालकमंत्री असल्यामुळे अ‍ॅड. अनिल परब (anil parab) यांना कोरोना (covid-19) कलावधीतही परवानगी कशी मिळते, असा प्रश्‍न भाजप प्रदेश सचिव निलेश राणे (nilesh rane) यांनी केला. पालकमंत्र्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दापोली येथे सीआरझेड (CRZ) कायद्याचे उल्लंघन करुन केलेल्या अनधिकृत वादग्रस्त बांधकामासंदर्भात ते बोलत होते.

निलेश राणे म्हणाले, मंत्री, आमदार, खासदार यांना अनधिकृत कामे करण्याचा परवाना मिळाला आहे. कोरोनामुळे सामान्य माणसाची गंभीर अवस्था झाली आहे. त्यामध्ये पालकमंत्री अनधिकृत बांधकाम करत फिरत आहेत. हे प्रकरण माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढे आणले असून त्याचा पाठपुरावा करत आहेत. याविषयी काही अधिकार्‍यांची आज आम्ही भेट घेतली असता तेही घाबरलेलेच होते. दापोलीत केलेले बांधकाम अनधिकृत आहे. त्यामुळे परब मंत्रीपदावरुन जाणार हे नक्कीच आहे. अधिकार्‍यांनीही ते मान्य करा आणि कारवाई करा अशी सुचना त्यांनी केली.

हेही वाचा: 'चाचणी, लसीकरणाला विरोध कराल तर गुन्हे दाखल करणार'

जिल्हाधिकारी सुट्टीवर आहेत. ते आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड झालेली आहे. नगरपालिकांमध्ये अनियमित कारभार सुरु आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर असून कोरोना वाढत आहे. याकडे गांभिर्याने कोणीच पाहत नाहीत. याचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकाम करण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. या गोष्टींना आताच रोखल्या पाहीजे. रेतीवर घर बांधणारे उद्या तुमच्या घरावर घरे उभे करतील.

जिल्हा नियोजनच्या निधीत 70 टक्के कपात केली आहे. तरीही दापोलीतील त्या रिसॉर्टकडे जाणार्‍या रस्त्यावर नियोजनचा पैसा खर्च केला आहे. तशी पाटी तिकडे लावण्यात आली आहे. गावागावांतील अनेक रस्ते निधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करत राहणार. माजी खासदार सोमय्या हे कोर्टातील लढाई लढतील तर आम्ही रस्त्यावर उतरुन लढाई यशस्वी करु असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 'एक मराठा लाख मराठा कोल्हापुरात पुन्हा एकदा एल्गार

loading image