esakal | 'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'

'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ठाकरे सरकारने (State goverrnment) मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत, ना कधी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. याच ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की समाज शांत आहे, म्हणजे तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. अशी तिखट प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (nilesh rane) यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) फेटाळून लावल्यानंतर राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. यावर निलेश राणे म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटलं नाही. कारण ठाकरे सरकार असेपर्यंत आरक्षण (reservation) मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही नव्हते. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे गेल्यावेळीच मी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)असोत किंवा शरद पवार (sharad pawar) असोत त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची ईच्छाच नव्हती. ते कधीही मराठ्यांच्या बाजूने बोलले नाहीत.

हेही वाचा: आजींची इच्छाशक्ती जिंकली! 98 व्या वर्षी कोरोनावर केली मात

ठाकरे सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना (youth) रस्त्यावर आणण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत. ते पुढे म्हणाले, मराठा समाज शांत आहे, याचा अर्थ असा नव्हे की, तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना लापायलाही जागा मिळणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा, पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

loading image