esakal | आजींची इच्छाशक्ती जिंकली! 98 व्या वर्षी कोरोनावर केली मात
sakal

बोलून बातमी शोधा

आजींची इच्छाशक्ती जिंकली! 98 व्या वर्षी कोरोनावर केली मात

आजींवर पूर्वी काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. त्यातच कोरोनाची लागण झाल्याचे समजले, मात्र आजी अजिबात घाबरल्या नाहीत.

आजींची इच्छाशक्ती जिंकली! 98 व्या वर्षी कोरोनावर केली मात

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

ढालगाव ( सांगली) : ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील ९८ वर्षीय श्रीमती नकुसा दत्तू चव्हाण (Nakusa chavan) या कोरोनावर मात करून आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत.

एकीकडे कोरोना (Corona)व्हायरसचा प्रकोपापुढे वैद्यकीय क्षेत्राबरोबर प्रशासनही हतबल झाले असताना, संकटातही ढालेवाडी (Dhalewadi) गावच्या श्रीमती नकुसा दत्तू चव्हाण (Nakusa chavan) या आजींनी अकरा दिवस उपचार घेऊन कोरोनावर सहजपणे मात करून इतरांना प्रोत्साहन दिले आहे. आजींवर पूर्वी काही शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. त्यातच कोरोनाची लागण झाल्याचे समजले, मात्र आजी अजिबात घाबरल्या नाहीत. (Nakusa chavan of dhalewadi has defeated corona)

हेही वाचा: इस्लामपुरात पर्यायी स्मशानभूमीचा शोध सुरू! प्रशासन जागेच्या शोधात

कोरोना झाल्यानंतर त्यांना २३ एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुलातील असलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सलग आकरा दिवस व्हेंटिलेटरवर प्राणवायू घेत अंथरूणाशी खिळूनच होत्या. काही दिवस आजीची तब्बेत स्थिर होती. मात्र आजी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत होत्या. रविवारी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यात त्या निगेटिव्ह आल्या. जिद्दीच्या जोरावर मृत्यूच्या दारातून यशस्वीपणे बाहेर पडल्या. सोमवारी कोविड सेंटरमधून आजींना सोडण्यात आले. आजीच्या पुनर्जन्म झाल्याबद्दल नातेवाईकांनी ढालेवाडी गावात पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

जिल्हा क्रीडा संकुलात असलेल्या कोविड सेंटरमध्ये अकरा दिवस घरच्यांसारखी काळजी घेतली, सर्वांनी आपुलकीने विचारपूस केली. औषधे वेळेवर दिली. त्यामुळे मी लवकर बरी झाले असल्याचे आजी सांगतात. कोविड सेंटरमध्ये आजीवर डॉ. एस. एस. जाधव, डॉ. पी. एस. पाटील, सचिन लिंमकर, हरी पवार, मनीषा पवार व नर्सेसनी चांगले उपचार केले व सेवा दिली. या सर्वांच्याच प्रयत्नाने आजी सुखरूप बाहेर पडल्या.

हेही वाचा: विहिरीत आढळलेल्या तरुणाचा खूनच; इचलकरंजी येथील घटना

अवघ्या अकरा दिवसात एक 98 वर्षीय आजी कोरोनावर मात करते, याचा आदर्श इतर कोरोना रुग्णांनी घेण्यासारखा आहे. दवाखान्यातून सोडताना घरी पाठवताना आजींचा जिल्हा क्रीडा संकुलातील असलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी पुष्पहार घालून सत्कार केला. (Nakusa chavan of dhalewadi has defeated corona)

loading image
go to top