
आज तिसऱ्या दिवशीही विविध मुद्दयांवरुन सकरावर टीकास्त्र सुरु होते.
सिंधुदुर्ग : गेले दोन दिवस सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. आजही विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. पहिल्या दिवशी वैधनानिक विकास महामंडळावरून आणि दुसऱ्या दिवशी वीज बिलावरुन सरकारला घेरण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशीही विविध मुद्दयांवरुन सकरावर टीकास्त्र सुरु होते.
दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे बिनकामाचे नेते रामदास कदम यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, त्यांना एका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुद्धा ऐकत नाहीत. त्या संबंधित पोलिस निरीक्षकांनी एका स्पर्धेला परवानगी दिली म्हणून रामदास कदम यांनी विधान परिषद सभागृहात तक्रार केली आहे. अशा प्रश्नांवर चर्चा करायला बाकी कोकणाचे सगळे विषय संपले आहेत का? असा आरोप केला आहे.
हेही वाचा - कोकण : देवा आलो तुझ्या चरणी म्हणत गणेशभक्तांनी घेतले फक्त कळसाचे दर्शन -
अजित पवारांकडून मोठी घोषणा
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात वीज कनेक्शन तोडलं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.