शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी निलेश राणे आले शेतीच्या बांदावर 

राजेश कळंबटे
Wednesday, 21 October 2020

हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः वाहून गेले. त्यामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे.

रत्नागिरी : परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. या शेतकऱ्यांची आज भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीत बांदावर जाऊन भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

एकीकडे कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः वाहून गेले. त्यामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे. हे भात पीक म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची वर्षाची बेगमी असते. परंतु परतीच्या पावसाने हा शेतकऱ्यांचा घास हिरावून गेला असून कोकणातील शेतकरी कोलमडून गेला आहे. वास्तविक शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक असतानाही राज्य शासनाचे डोळे केंद्राकडे लागून राहिले आहेत. 

कोलमडलेल्या या कोकणी भूमिपुत्रांसाठी माजी खासदार निलेश राणे सरसावले आहेत. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून हेक्टरी दीड लाखाची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर आज रत्नागिरी दौऱ्यावर येऊन निलेश राणे यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष शेतीच्या बांदावर जाऊन भेट घेतली. झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी त्या त्या भागातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांकडूनही  त्यांनी पंचनाम्याची माहिती घेत आढावा घेतला. तर भारतीय जनता पक्ष सदैव आपल्या पाठीशी असल्याचेही ग्वाहीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी त्यांनी या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सहायय केले. 

निलेश राणे यांनी रत्नागिरी तालुकयातील निवळी, हरचिरी, चांदेराई, चाळके वाडी, सोमेश्वर, चिंचखरी आदी भागांचा दौरा केला. 

हे पण वाचाखडसे यांचे आता उतार वयातील राजकारण, त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, राजू भाटलेकर, महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, उमेश कुलकर्णी, भाई जठार, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, दादा दळी, पिंट्या निवळकर, नंदकिशोर चव्हाण, नित्यानंद दळवी, संकेत चवंडे, अविनाश पावसकर,  अमर किर, संतोष बोरकर, शिवाजी कारेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane meet to farmers