प्रदेश सरचिटणीसपदाचा नीलेश राणेंचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

रत्नागिरी - काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा विषय गेली दीड ते दोन वर्षे प्रदेश पातळीवर सोडवता आलेला नाही. पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती अतिशय बिकट आहे. हा विषय गांभीर्याने हाताळलेला नाही. प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करणे मला शक्‍य नाही. या नेतृत्वाच्या कारभाराचे वाटेकरी मला व्हायचे नाही. हे पद भरत नाही, यामागे वेगळा राजकीय वास येऊ लागला आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला.

रत्नागिरी - काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा विषय गेली दीड ते दोन वर्षे प्रदेश पातळीवर सोडवता आलेला नाही. पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती अतिशय बिकट आहे. हा विषय गांभीर्याने हाताळलेला नाही. प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करणे मला शक्‍य नाही. या नेतृत्वाच्या कारभाराचे वाटेकरी मला व्हायचे नाही. हे पद भरत नाही, यामागे वेगळा राजकीय वास येऊ लागला आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे दिला. या पत्रात नीलेश यांनी म्हटले आहे की, दीड वर्षांपासून आपल्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्ष देण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष भेटलो होतो. पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचे नुकसान झाले, पराभव झाला. जिल्हाध्यक्षपद नाही, हे त्याचे प्रमुख कारण होते. प्रचारादरम्यान आम्हाला याबाबत कार्यकर्ते, मतदार विचारत होते की, तुम्हाला प्रदेश पातळीवर जिल्हाध्यक्ष देत नाही, अशा पक्षाला आम्ही मतदान का करावे? यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष टिकविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत; परंतु संघटनात्मक पातळीवर जिल्हाध्यक्षपद महत्त्वाचे आहे. त्यातही तुम्ही गांभार्याने लक्ष घातले नाही. त्यामुळे सरचिटणीस म्हणून तुमच्या सोबत काम करणे मला शक्‍य नाही.

प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली असा कारभार चालत राहणार असेल तर त्याचा वाटेकरी मला व्हायचे नाही. लोकसेवेसाठी व लोकहितासाठी आम्ही समाजसेवेमध्ये आलो आहे. कोणत्या पदासाठी नाही. पक्षाकडे कधी काही मागितलेलेही नाही. तुमच्या पदाचा वापर हा फक्त तुमच्यासाठी करत असाल तर पक्षाची अजून दयनीय अवस्था होईल. तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊ शकत नाही तर प्रदेश काँग्रेस समितीमध्ये राहणे मला शक्‍य नाही. हीच अवस्था राहिली तर उद्या ग्रामपंचायतीची उमेदवारी मागायला देखील कोणी पुढे येणार नाहीत. जिल्ह्याचे अजून किती नुकसान करायचे आहे, हेच आम्हाला बघायचे आहे. मी सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे; परंतु यापुढेही काँग्रेस पक्षाचे काम करतच राहणार.

Web Title: Nilesh rane resign