मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; नीलेश राणे

माजी खासदार नीलेश राणे : ठाकरे सरकारने पाठराखण करू नये
Nilesh Rane statement File a charge of treason against nawab Malik
Nilesh Rane statement File a charge of treason against nawab Maliksakal

रत्नागिरी : महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ज्या कारणामुळे ईडीची कारवाई झाली आहे त्यानुसार ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. याचा विचार करून जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ ठाकरे सरकारने ताबडतोब थांबवावा आणि मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरवणाऱ्या नवाब मलिक यांचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला आहे. तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडवले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र उघडकीस येऊ लागले आहे.

मंत्री मलिकांनी यांनी केलेला व्यवहार हा त्या षड्‌यंत्राचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही मलिक यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर न उतरणारे अनेक मंत्री मलिकांना वाचवण्यासाठी मंत्रालयाबाहेर बसण्यासाठी धावत आहेत. ही देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत घातक आहे.नवाब मलिकांना वाचवण्याकरिता आणि सत्ता टिकवण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करत देशद्रोह्याची तरफदारी करत आहोत, याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र कणाहीन नाही, हे दाखवण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादी कृत्य हातभार लावणाऱ्या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चंवडे, शहराध्यक्ष सचिन करमकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

शिवसेना अनेक विषयात अडचणीत

शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आली आहे. सध्या संजय राऊत यांची देहबोली बघितली तर ते पूर्णपणे ढेपाळलेत हे लक्षात येईल. आता ते धड बोलू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका नीलेश राणे यांनी केली. तसेच मलिकांच्या चौकशीसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये धावणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या सोशल मीडियावर बागेत फिरतानाचे फोटो पोस्ट करत आहेत. यावरून त्यांच्याही परिस्थिती लक्षात आली असावी, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com